वन्यजीव प्रेमिनी अजगराला दिले जीवनदान

 

जिल्हा प्रतिनिधि // उमंग शुक्ला

 

७ ते ८ फुटाच्या अजगर जातीच्या सापाला* *कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा चे विद्यार्थी  तसेच वन्यजीव प्रेमी, विशाल सतीश मालवीय व त्यांच्या पत्नी *सौ.सोनाली विशाल मालवीय* यांनी दिले जीवनदान..

दिनाक : ०४.जानेवारी.२०२२ला दुपारी ०२:०० वाजताच्या सुमारास मार्डी इथे सौरभ काशिराम मेश्राम यांच्या शेता मध्ये यांना तुरीच्या गंजी खाली अजगर आढळून आला.आणि सौरभ काशिराम मेश्राम यांनी लगेच कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा चे विद्यार्थी तसेच वन्यजीव प्रेमी सर्प मित्र विशाल मालवीय यांना फोन करून माहिती दिली असता.सर्प मित्र हे अमरावती वरून 20 ते 25 मिनटा मध्ये मार्डी घटना स्थळ पोहचले.तुरीच्या गंजी खाली अजगर असल्याची माहिती शेत मालकाने दिली व वन्यजीव प्रेमी तसेच कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा चे विद्यार्थी विशाल सतीश.मालवीय व त्यांच्या पत्नी सौ.सोनाली विशाल मालवीय या दोघां नवरा बायको नी एकमेकांची मदत घेऊन या दोघांनी अटल 2 तास परिश्रम करून या ७ ते ८ फुटाच्या अजगराला रेस्क्यू करून जंगलात सुखरूप रित्या सोडले.