महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने कापड़ी पिशवी वाटप कार्यक्रम संपन्न

 

जिल्हा प्रतिनिधि // उमंग शुक्ला

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य कापडी पिशवी वाटप वितरण कार्यक्रम महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम आयोजित करण्यात
आला.सदर कापडी पिशवी वाटपाचा कार्यक्रम जिजामाता प्राथमिक शाळा, तेलंगराय प्राथमिक शाळा हिंदी प्राथमिक शाळा, शिवाजी प्राथमिक शाळा इत्यादी ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य घेण्यात आला. कापडी पिशवी वाटप करतांना श्री गजानना गायकवाड सहायक प्रकल्प अधिकारी(NULM) नगर परिषद आर्वी. हे उपस्थित होते. प्लास्टिक पिशव्या या पर्यावरणाला कश्या घातक आहे व त्यावर मत म्हणून आपण कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे अशी माहिती गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना दिली. कापडी पिशवी वाटप करतांना जिजामाता शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रीकांत निनावे सर , तेलंगराय शाळेचे मुख्याध्यापक श्री पंकज कदम सर, हिंदी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका निगार सुलताना , तर शिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. पद्मा चौधरी व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी लोकसंचालीत साधन केंद्र आर्वी येथील क्षेत्रीय समन्वयक स्मिता भेंडे तसेच सहयोगिनी सीमा कुशवाह उपस्थित होत्या.