अट्टल जनावर चोर सेवाग्राम पोलीसांच्या ताब्यात हिंगना, सेलू, सेवाग्राम चे गुन्हे उघड

 

 

जिल्हा प्रतिनिधि // उमंग शुक्ला

‌फिर्यादी नामे विशाल अशोक फुलझेले वय 36 वर्ष धंदा शेती रा बरबडी जि वर्धा यांनी दि. 04/12/2022 रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की, दि 28/12/2021 चे रात्री 6.00 वा त्यांचेदोन पांढरे रंगाचे बैल बांधुन घरी आले दि 29/12/2021 च्या सकाळी 6.00 वा शेतात गेले असता त्याना बैल जोडी दिसुन आली नाही ते आजुबाजूला शोध घेत असता त्याचे शेत शेजारी वासुदेव सुरेश थोडे रा बरबडी यांनी सांगितले की त्यांचे सुद्धा बैलजोडी दिसत नाही आजपावेतो फिर्यादी ने बैलजोडी चा शोध घेतला मिळुन न आल्याने प्रत्येकी बैलजोडी 60000/- रु ची याप्रमाणे 2 बैलजोडी कि 120000 रू तसेच 2 डाले ( टोपले )ची कोणीतरी अग्यात चोरट्यांनी चोरून नेल्याचे रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेवून पो. स्टे. परिसरात गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळाले ल्या माहिती प्रमाने एक बोलेरो मालवाहू चोरीच्या जनावरांची वाहतूक करित मसाळा कडे येनार आहे करिता नाकेबंदी करून सदर वाहन थाबवुन पाहनी केली असता 2गाय व वासरू दिसुन आले ते कोठून आपल्या बाबत विचारपुस केली असता कान्होलीबारा येथुन चोरून आनल्याचे सांगितले गाडीची आणखी पाहनी केली असता कँबिनवर दोन डाले (टोपले) दिसून आले. त्यावरून विचारपूस केली असता बरबडी येथुन 2बैलजोडी चोरल्या तेथुनच सदर डाले आणल्याचे सांगितले करिता आरोपी क्र1 प्रशांत अशोक सोमनकर वय 30 क्र 2 फिरोज नुर शेख वय 32 दोन्ही रा कानोलीबारा क्र 3 राहुल रामचंद्र कोहळे वय 32 रा पुलफैल वर्धा याना अटक करून विचारपूस केली असता सेलू कानोलीबारा येथे जनावरे चोरल्याचा कबुली दिली
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे पोलीस स्टेशन सेवाग्राम याचे निर्देशाप्रमाणे पोऊपनी जितेंद्र ठाकुर पो. हवा. हरिदास काकड, नापोशि. गजानन कठाणे, जयेश डांगे, पोशि पवन झाडे अभय आगळे नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम तसेच सायबर सेल चे अक्षय राऊत यांनी केली.