पी एन भेले जूनियर कॉलेज नारा येथे सावित्री फातिमा महोत्सव साजरा

 

धिरज कसारे// तालुका प्रतिनिधी कारंजा

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीआई फुले ना भारतरत्न दया-सरपंच कविता ताई सोमकुवर

 

पी एन भेले ज्युनिअर कॉलेज नारा येथे सतत 20 वर्षपासून सावित्री फातिमा मोहोत्सव दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा साजरा करण्यात आला या प्रसंगी कारंजा घा पोलीस स्टेशन ठाणेदार डी. डी. राजपूत साहेब यांनी विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शन केले तसेच नारा येथिल प्रथम नागरिक आ.कविता ताई सोमकुवर यांनी आपल्या भाषणात विषद करताना आई सावित्रीआई फुले यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे व आमच्या प्रत्येक स्त्री त्यांच्या पावलावर पाऊल देऊन आपण सुद्धा शाळेचं महत्व प्रत्येक गावात समजवून स्त्री ला प्रत्येक क्षेत्रात मदत करावी, कारण मी सुद्धा 12 मुलींना ग्राम पंचायत मार्फत दत्तक घेऊन ,मी सुध्दा आज सावित्रीआई फुले यांनी दिलेला मंत्र शिक्षणाचं जपला
या नंतर कार्यक्रमाचे प्रास्तविक कॉलेज चे समनव्यक व मिशन ऑफिसरचे संचालक प्रा विनोद बागडे यांनी प्रास्तविक केले.उत्कृष्ट संचालन कु हिमानी केने यांनी केले
तर भ्रमध्वनी द्वारे हार्दिक मंगल कामना डॉ सुरेश सोमकुवर यांनी दिल्या
विचार मंचावर ललिता ताई घागरे माजी पं स. सदस्या कारंजा ,प्रेमाला ताई काकडे ,फराकडे मॅडम बारांगे सर,
अनिल ढोमने उपस्थित होते प्राचार्य आकाश दोडके यांनी आभार मानले
भावना वावरकर ,चेतना सोमकुवर आचल सोमकुवर आकाश सोमकुवर आचल पेंदाम पल्लवी नांदने नुमान पठाण ,प्रणय,निकिता, वर्षा प्राची,दामिनी,अंकिता स्वप्निल यांनी संपूर्ण कार्यक्रमाची यशस्वीपणे जबादारी पार पडली