जिल्हा प्रतिनिधि // उमंग शुक्ला
फिर्यादी नामे जितेन्द्र मनोहर नरांजे वय 27 वर्शे काम सुपरवायझर रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट यांनी पो.स्टे.ला जावून तोंडी रिपोर्ट दिली की, दिनांक 30/12/2021 चे 10.00 वाजता ते दिनांक 31/12/2021 चे 09.00 वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात ईसमाने त्यांचे रिलायंस जियो कंपनीचे लाडकी व नांदगाव या साईडवरील टाॅवरच्या दोन ब्याटऱ्या किंमत 14,000/- रूपये आणी बुरकोनी या रिलायंस जियो चे साईडवरील 35 मिटर लांबीचा काॅपर केबल किंमत 63,000/- रूपये असा एकुण 74,000/- रू चा माल चोरून नेला. अष्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवर पो.स्टे.ला अप. क्रमांक 04/2022 कलम 379 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
तसेच दिनांक 31/12/2021 ते दिनांक 01/01/2022 दरम्यान अज्ञात ईसमाने फिर्यादीचे भिमनगर वार्ड हिंगणघाट येथील रिलायंस जियो टाॅवरचे साईड वरील एक मोठी ईन्व्हर्टर बॅटरी किंमत 90,000/- रूपये, एक बॅटरी किंमत 5000/- रूपये आणी 05 नग रेक्टीफायर मषीन किंमत प्रत्येकी 5000/- रूपये असा 25,000/- रू असा एकुण 1,20,000/- रू चा माल अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे रिपोर्ट वर पो.स्टे.ला अप. क्रमांक 05/2022 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
वर नमुद लागोपाठ घडलेल्या दोन्ही गुन्हयांची गांभिर्यता पाहता आणी टाॅवर वरील साहित्य चोरणारी टोळी सक्रीय झाल्याचे लक्षात येताच ठाणेदार श्री. संपत चव्हाण यांनी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांना गुन्हयासंबंधाने मार्गदर्षन करून अज्ञात आरोपीतांचा षोध घेण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने पो.हवा. विवेक बनसोड यांनी आरोपी नामे 1) संदीप अरविंद उपरे वय 33 वर्शे, 2) गजानन महादेवराव राउत वय 40 वर्शे 3) दिपक भाउरावजी कोल्हे वय 38 वर्शे 4) राजेष उमराव धुर्वे वय 43 वर्शे सर्व रा. षिवाजी वार्ड हिंगणघाट यांना निश्प्ण्ण करून त्यांचे ताब्यातुन दोन्ही गुन्हयात चोरीस गेलेला संपुर्ण मुददेमाल, गुन्हा करतेवेळी वापरलेले दोन वाहन आणी केबल कापण्याकरीता वापरलेले कटर, पेंचीस, पेचकस हातोडी असा एकुण असा एकुण 2,07,000/- रू चा माल जप्त करून टाॅवरच्या बॅटÚया व केबल चोरणाÚया टोळीस अटक करून दोन गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कार्यवाही श्री.प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. यषवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. दिनेष कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग आणी ठाणेदार श्री. संपत चव्हाण, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेषन हिंगणघाट यांचे मार्गदर्षनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे आणी प्रषांत वाटखेडेे यांनी केली.