म्हारी छोरियां किसी छोरों से कम है क्या ;कपिल ठाकुर जिल्हास्तरीय हॉलीबाल स्पर्धेत आर्वी च्या मुलींनि मारली बाजी

 

जिल्हा प्रतिनिधि // उमंग शुक्ला

आज संपूर्ण राज्यामध्ये बालिका दिन साजरा होत आहे परंतु आजही मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन राज्यांमध्ये पूर्णपणे बदललेला नाही आजही मुलींना सैन्यामध्ये मैदानामध्ये पाठविण्याचा पालकांचा दृष्टिकोन पाहिजे तितका सकारात्मक नाही आज मी गेल्या 28 वर्षापासून मुलींचे वॉलीबॉल संघ तयार करत आहे संपूर्ण राज्यात जिल्ह्यात माझ्या मुली वॉलीबॉल स्पर्धा गाजवत आहे आज जवळपास 40 च्या वर माझ्या नेतृत्वामध्ये मुलींनी राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहे व मागील दोन वर्षांपूर्वी एका मुलींनी खेलो इंडिया ही स्पर्धा सुद्धा गाजवून महाराष्ट्राला द्वितीय स्थान प्राप्त करून दिले होते हे विशेष जवळपास पंधरा च्या वर मुलींनी महाराष्ट्राचे कर्णधारपद सुद्धा भूषवले आहे जर नक्कीच पालकांकडून व शिक्षकांकडून मुलींना खेळाबद्दल प्रतिसाद मिळाला तर आज जी समाजामध्ये विकृतीची भावना आहे ती नक्कीच लोप पावून प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलीसुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणार नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये आर्वीच्या मुलींनी बाजी मारली हे विशेष व पुढे सुद्धा नक्कीच या संपूर्ण मुली आपल्या राज्याचे जिल्ह्याचे नाव उंचावणार यात शंका नाही