निसर्गसाथीचे पक्षी निरीक्षण :डॉ आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थ्यांचा सहभाग

 

 

जिल्हा प्रतिनिधि // उमंग शुक्ला

निसर्गसाथी फाउंडेशन हिंगणघाट शहरात मागील पाच वर्षांपासून पशु ,पक्षी ,पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहे.निसर्गप्रेमींना पशु पक्षी आदींची ओळख व्हावी,त्यांचा जवळुन अभ्यास व्हावा , निरीक्षण करता यावे यासाठी शहरातील आपल्या सारख्या दानशुर व्यक्तींनी अती उच्च दर्जाच्या ३ दुर्बीणी उपलब्ध करून दिल्यात.या दुर्बीणीचे सहाय्याने विद्यार्थी अगदी पक्षी निरीक्षण करुन पशु पक्षी आदींचा जवळुन अभ्यास करणार आहे.
निसर्गसाथी फाउंडेशनच्या पक्षी निरीक्षण कार्यक्रम उपक्रमांतर्गत शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता पोथरा धरण परीसरात पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात हिंगणघाट शहरातील डॉ आंबेडकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांना Green bee eater(वेडाराघू ) Black drongo(कोतवाल) Littel egret (छोटा बगळा) Great egret (मोठा बगळा) Asian opeanbilled stork (उघड्या चोचीचा करकोचा) River tern (नदी सूर्य ) Black winged stilt (शेकाट्या) Spotbilled duck(हळदी कुंकू बदक) Littel carmorant(छोटा पानकावळा) Grey wagtial (करडा धोबी) Cotton teal (काळकुठं बदक) Purple heron (जांभळा बगळा) Common coot (वारकरी बदक) या प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले
निसर्गसाथी फाउंडेशन च्या पक्षी निरीक्षण उपक्रमास डॉ आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचीव अनिलभाउ जवादे यांनी शुभेच्छा दिल्या , पोथरा धरण परीसरात आयोजित पक्षी निरीक्षण कार्यक्रमात निसर्गसाथी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रवीण कडु निरीक्षणात आढळलेल्या पक्षांविषयी माहीती दिली यावेळी डॉ आंबेडकर विद्यालयाचे डा प्रा नगराळे ,प्रा‌ उमेश ढोबळे,प्रा महेश माकडे, गोपाळ मांडवकर,पपेश मुंजेवार, आशिष हाडके , निसर्गसाथी राकेश झाडे, प्रभाकर कोळसे, गुणवंत ठाकरे,चेतन वावधने,करण विटाळे आदीची उपस्थिती होती