चारचाकी वाहनासह एकूण ३,४८,०००/- रु. चा विदेशी दारूसाठा जप्त.

जिल्हा प्रतिनिधि / / उमंग शुक्ला

दिनांक ०२-०१-२०२२ रोजी चारचाकी वाहनाने अवैधरित्या विदेशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्हयात येत असल्याची मुखबीर कडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने मौजा सालोड टी-पॉईंट उडान पुलाजवळ योजनाबध्द पध्दतीने सापळा रचून नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहितीप्रमाणे एक हुंडाई कंपनीची निळी वरना येत असल्याचे दिसून आल्याने सदर कार थांबवून कारची झडती घेतली असता कारमध्ये ओ.सी. ब्लु कंपनीच्या व बी-७ स्टार्लिंग रिजर्व कंपनीच्या विदेशी दारूचा साठा किंमत ४८,०००/- रु. अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आल्याने विदेशी दारूचा साठा किंमत ४८,०००/- रु. व हुंडाई कंपनीची निळी वरना क्रमांक एमएच-४३/आर-३९२ की. ३,००००/- असा एकूण किंमत ३,४८,०००/- रु. चा माल जप्त करून आरोपी आरोपी १) अक्षय विजय खडसे, वय २७ वर्ष, रा. हिंद नगर वर्धा, २) आकाश पुरुषोत्तम पुसदेकर, वय १९ वर्ष, रा. गणेश नगर, वर्धा यांचे विरुद्ध पो.स्टे. सावंगी येथे दारूबंदी कायद्यान्वये अप.क्र. ४/२०२२ कलम ६५ (अ) (ई), ७७ (अ), ८३ म.दा.का. सहकलम ३ (१८१), १३०/१७७ मो.वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा श्री संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. सौरभ घरडे पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, स्वप्नील भारद्वाज, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टणकर, नवनाथ मुंडे व दिनेश बोथकर यांनी केली.