मा. ना. जयंत पाटील, जलसम्पदा मंत्री तथा मा. ना. अनिल देशमुख, गृहमंत्री यांना विविध समस्या बाबत जिल्हा गडचिरोली शिवसेने तर्फे निवेदन देण्यात आले

दिनांक 28/01/2021ला अहेरी येथे शासकीय आढावा बैठक तथा राष्ट्रवादी कॉन्ग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सभेत उपस्थित राहण्यासाठी *मा. ना. जयंत पाटील, जलसंपदा मंत्री आणि मा ना. अनिल देशमुख, गृहमंत्री*
आले असता अहेरी विधानसभा तथा गडचिरोली जिल्ह्यातील समस्या बाबत खालील प्रमाणे निवेदन देण्यात आले. 
1)सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीदेवीपेटा येथील शेतकऱ्याची जमिनीबाबत समस्या सोडविण्याबाबत. 
2)अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील मुस्लिम समाज सरकारी कब्रस्थानावर मा. राहुल गायकवाड, उपपोलीस अधीक्षक जिमलगट्टा यांनी अतिक्रमण केलेली जमीन परत करण्याबाबत. 
3)गडचिरोली जिल्ह्यातील दारू बंदी हटवून पुनःश्च सुरु करण्याबाबत. आणि इतर विषयी निवेदन देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने *राजगोपाल सुल्वावार शिवसेना जिल्हा प्रमुख, रियाजभाई शेख उपजिल्हा प्रमुख, अरुणभाऊ धुर्वे विधानसभा प्रमुख, बिरजूभाऊ गेडाम संघटक, अक्षय करपे तालुका प्रमुख (शहर ), सज्जू शेख आलापल्ली युवासेना शहर प्रमुख, जेष्ठ शिवसैनिक संपतराव मेचींनेनी, गणीभाई, जावेदभाई सर्व अंकिसा, राजू येनगंटीवार, अंकुश मंडलवार युवासेना उपशहर प्रमुख*
उपस्थित होते.