प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सतिश राचर्लावार तर सचिवपदी तिरुपती चिट्याला यांची निवड

 

सिरोंचा ता प्र :- पत्रकारांची संघटना असलेल्या प्रेस क्लबच्या आज २६ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत प्रेस क्लबची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली असून या नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी सतिश राचर्लावार तर उपाध्यक्ष पदी रवि कालकोटा सचिव पदी तिरुपती चिट्याला यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या वेळी न्यूज 18 लोकमत वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी आणि टीव्ही 9 वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी एम,डी,इरफ़ान यांचा मार्गदर्शनात नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली,,,, आज २६ जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे पारपाडण्यात आली असून कार्यकारणी सदस्यांमध्ये संदीप राचर्लावार,नागभूषणम चकिनारपूवार,अमित तिप्पटी,नरेश धर्मपुरी,कैंसर खान,श्याम दुलम,उज्वल तिवारी,संतोष ताटीकोंडा,श्याम बेज्जनवार,सतिश पडमटिंटी,अशोक कुम्मरी,माजिद अली,देवया येनागंदूला, यांचा समावेश आहे बैठकीत नवीन कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या,,,,,