नारायणपूर येथील धान उत्पादक शेतकऱ्यांसोबत धान खरेदी बद्दल उपप्रादेशिक व्यवस्थापकाची चर्चा      धान खरेदीची मर्यादा न वाढविल्याने महामंडळ व राज्य सरकारप्रती शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी*      धान उत्पादक शेतकरी एकरी 20 क्विंटल धान खरेदी करण्याचे मागणीवर ठाम

नारायणपूर येथील धान उत्पादक शेतकऱ्यांसोबत धान खरेदी बद्दल उपप्रादेशिक व्यवस्थापकाची चर्चा

 

 

      सिरोंचा….तालुक्यातील नारायणपूर (करसपल्ली)येथील धान उत्पादक शेतकऱ्यांसोबत आदिवासी विकास महामंडळाचे उपव्यवस्थापक श्री मुडेवार यांनी गुरूवारला अमरावती येथील आधारभूत खरेदी केंद्राला भेट देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करून आविका मार्फत आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्याचे विनंती केले असता यावेळी उपस्तीत धान उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र धान खरेदीची मर्यादा प्रति एकरी 20 क्विंटल प्रमाणे खरेदी करण्याचे मर्यादा ना वाढविल्यास धान विक्री करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

 

           यावेळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान खरेदी करण्याची मर्यादा अध्याप न वाढविल्याने महामंडळ व सरकरप्रति तीव्र नाराजी व्यक्त केले.

 

          यावेळी उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी तालुक्यातील सर्व खरेदी केंद्राला भेट देऊन धान खरेदी बद्दल माहिती घेतले असता एकही खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धान विक्री केल्याचे दिसून आले नाही.

        

 

         यापूर्वी नारायणपूर व परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी महामंडळ व सरकारने काढलेल्या प्रति एकरी 9 क्विंटल 60 किलो धान खरेदी करण्याचे अध्यादेश मागे घेऊन जाचक अटी रद्द करून प्रति एकरी किमान 20 ते 25 क्विंटल धान खरेदी करण्यात यावी म्हणून चक्काजाम आंदोलन करून व निवेदने देऊन धान खरेदी करण्याचे मर्यादा वाढविण्याचे महामंडळ व सरकारला विनंती केले होते.शेतकऱ्यांच्या या मागणीवर तोडगा न निघाल्याने मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान शेतातच पडून असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

 

        राज्य सरकार व महामंडळाने तात्काळ योग्य निर्णय घेऊन यावर तात्काळ तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याची माहिती तालुक्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.